पश्चिम बंगाल हिंसाचार : चौकशीसाठी गृहमंत्रालयाने नेमले चार सदस्यांचे पथक

Maharashtra Today

नवी दिल्ली :- पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी गृहमंत्रालयाने चार सदस्यांचे एक पथक नेमले आहे. या पथकाकडून आता या हिंसाचाराची सखोल चौकशी करण्यात (Four-member team appointed by the Home Ministry to investigate) येणार असल्याचं सांगण्यात आलं.

निवडणूक प्रक्रिया संपताच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळून आला. गेल्या काही दिवसांत राज्यात १४ कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा आरोप करत भाजपाने तृणमूलला लक्ष्य केले. या हिंसाचारात आपल्या एका कार्यकर्त्याचीही हत्या झाल्याचा आरोप तृणमूलने केला.

हिंसाचाराच्या पाहणीसाठी भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P Nadda) मंगळवारी बंगालमध्ये गेले होते. तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना हिंसाचाराचा सामना करावा लागतो आहे, असे नड्डा म्हणालेत. बंगालमधील हिंसाचार हा देशाच्या फाळणीवेळच्या हिंसाचाराचे स्मरण करून देणारा असून, स्वातंत्र्योत्तर काळात मी असा हिंसाचार कधी पाहिला नाही, असे नड्डा म्हणाले.

काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी यावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “अशा पद्धतीच्या हिंसाचाराच्या घटना सहन केल्या जाणार नाही. जिथे भाजपा जिंकले आहे, तिथे याहूनही अधिक गोंधळ माजलेला आहे. भाजपा जुने व्हिडिओ दाखवून या घटनांचा बनाव करत आहे. माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की त्यांनी असे प्रकार थांबवावेत. बंगाल ही एकता असलेली भूमी आहे”.

तर पंतप्रधान-राज्यपाल चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यपाल जगदीप धनकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून पश्चिम बंगालमधील परिस्थितीचा आढावा घेतला. हिंसाचाराबद्दल मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे राज्यपालांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button