पश्चिम बंगाल : तृणमूलची बाईक रॅली सुसाट; भाजपाच्या यात्रेला परवानगी नाही!

Mamata Banerjee

कोलकाता :- पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू जोरात आहे. तृणमूल काँग्रेस शनिवारपासून नदिया जिल्ह्यात दोन दिवसांची बाईक रॅली (Trinamool bike rally) काढणार आहे. या ‘जनसमर्थन यात्रे’ला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र,  भाजपाच्या ‘परिवर्तन रथयात्रे’ला पोलिसांनी अद्याप परवानगी दिली नाही. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

भाजपाच्या यात्रेला परवानगी का नाकरण्यात येते आहे, असा प्रश्न भाजपाच्या नेत्यांनी केला आहे. भाजपाचे नेते आक्रमक झाले आहेत. तृणमूल काँग्रेसची जनसमर्थन यात्रा शनिवारपासून छपरा जिल्ह्यातून  सुरू होणार आहे. छपरा, त्रिवेणी, कृष्णानगर करत यात्रेचा समारोप पलाशीमध्ये होणार आहे.

पोलिसांनी परवानगी दिली नाही तरी यात्रा काढू, असे भाजपाने म्हटले आहे. भाजपाच्या परिवर्तन यात्रेबाबत पोलिसांनी स्पष्टीकरण मागितले आहे. ही यात्राही शनिवारपासून सुरू होणार आहे. मात्र, त्याला अद्याप परवानगी मिळालेली नाही.

या यात्रेच्या सुरुवातीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा संबोधित करणार आहेत. भाजपाच्या नबद्वीप येथील रॅलीला आणि नड्डा यांच्या भाषणाला परवानगी देण्यात आली आहे; मात्र यात्रेला अद्याप परवानगी देण्यात आली नाही, असे कृष्णानगर पोलीस ठाण्याचे अधीक्षक विश्वजित घोष यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER