पश्चिम बंगाल : भाजपा नेत्याच्या हत्येच्या निषेधात निदर्शने, पोलिसांचा लाठीचार्ज

West Bengal

कोलकाता :पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात पक्षनेते मनीष शुक्ला यांच्या हत्येच्या निषेधात आज भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कोलकातामध्ये निदर्शने केली. राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्यात. निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांनी ‘वॉटर कॅनॉन’चा वापर केला.

अश्रुधुराचाही वापर करण्यात आला. लाठीचार्ज केला. निदर्शनात पक्षाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनीही भाग घेतला. पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे जमावाने दगडफेक केली. परिसरात पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात आली आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी सचिवालयाबाहेर जोरदार निदर्शन केली.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. निदर्शकांनी जाळपोळ केल्याचा आरोप केला जात आहे. सचिवालयापर्यंत पोहचण्याआधीच पोलिसांनी अडवले, असा दावा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला. निदर्शनांमुळे परगणा इथे सध्या परिस्थिती तणावाची आहे.

 

“पोलीस आमच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करत होते. खिदीरपूरच्या बाजूने दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी ते पाहिले नाही का?” असा सवाल भाजपा नेते लॉकेट चटर्जी यांनी विचारला आहे. अनेक भाजपा नेते प्रदेश भाजपा उपाध्यक्ष राजू बॅनर्जी आणि खासदार ज्योर्तिमय सिंह माहातो जखमी झाल्याची माहिती आहेत. घटनास्थळावर गोंधळाची स्थिती होती. भाजपा कार्यकर्त्यांनीही पोलिसांवर दगडफेक केली असे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. हावडामधील रस्त्यावर टायर जाळण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER