पश्चिम बंगाल : बाबुल सुप्रियोंसह भाजपाचे चार खासदार निवडणुकीच्या मैदानात

Babul Supriyo - Maharastra Today

कोलकाता : केंद्रीय मंत्री आणि खासदार बाबुल सुप्रियो यांच्यासह चार खासदारांना भाजपाने बंगालमध्ये विधानसभेच्या मैदानात उतरवले आहे. बाबुल सुप्रियो टॉलिगंजमधून, निशीथ प्रामाणिक दिनहाटा, लॉकेट चटर्जी चुंचुरा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. राज्यसभेचे खासदार स्वपनदास गुप्ता यांना तारकेश्वरमधून तिकीट देण्यात आले आहे.

भाजपाने आज २७ उमदेवारांची तिसरी यादी घोषित केली. यात अभिनेते आणि अभिनेत्रींचाही समावेश आहे. टीएमसी सोडून भाजपामध्ये आलेल्या राजीव बॅनर्जी यांना डोमजूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER