West Bengal Elections 2021 : गांगुली राजकारणात प्रवेश करणार का?

Sourav Ganguly

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसी आणि भाजपा यांच्यात जोरदार टक्कर आहे. यातच सगळ्यांचे लक्ष बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीवर (Sourav Ganguly) आहे. सौरव गांगुली लवकरच राजकारणात प्रवेश करेल, असा अंदाज आहे. सौरव गांगुली म्हणले की, “आयुष्याने मला खूप संधी दिल्या, बघू पुढे काय होते. माझी तब्येत आता ठीक आहे आणि कामालाही सुरुवात केले आहे.

राजकारणात प्रवेश करण्याबाबत सौरव गांगुलीने उत्तर देणे टाळले. यात नेमकी रणनीती काय आहे, याबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्याच्या ब्रिगेड मैदानात प्रचारसभा घेतली. या सभेत गांगुली सहभागी होईल, असे बोलत होते. मात्र ते आले नाही. मागील काही दिवसांपासून गांगुलीची तब्येत खराब होती. २ जानेवारीला घरात व्यायाम करताना त्यांना हृदय विकाराचा धक्का लागला. रुग्णालयात ५ दिवस राहिल्यानंतर ते घरी आले. पण २७ जानेवारीला त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. यानंतर त्यांना कोलकात्याच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

आता आयपीएल २०२१ चे यशस्वी आयोजन करण्याची जबाबदारी गांगुली यांच्यावर आहे. ९ एप्रिलपासून यंदाच्या आयपीएलला सुरूवात होणार तर ३० मे ला फायनल खेळली जाणार आहे. यावर्षी कोणतीही टीम त्यांच्या घरच्या मैदानात खेळणार नाही. आयपीएलचे आयोजन मुंबई, कोलकाता, चेन्नई, बँगलोर, दिल्ली आणि अहमदाबाद या सहा शहरांमध्ये होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER