पश्चिम बंगालमध्ये भाजपा आघाडीवर ; ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पिछाडीवर

Maharashtra Today

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे.विधानसभेच्या 294 जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान झाले होते. सत्तेत येण्यासाठी बसण्यासाठी 148 जागा जिंकणे बंधनकारक आहे . त्यामुळे कोणता पक्ष बहुमताच्या या आकड्यापर्यंत पोहोचणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
नंदीग्राममध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी आघाडीवर; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) पिछाडीवर आहेत. या वेळी बंगालमध्ये टीएमसी प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारात 44 दिवस व्हीलचेअरवर प्रचार करत होत्या.

पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये सुमारे 20 जाहीर सभा घेतल्या आणि अमित शहा यांनी सुमारे 70 रॅली काढल्या. टीएमसी उमेदवाराच्या समर्थनार्थ ममता बॅनर्जी यांनी सुमारे 150 जाहीर सभांना संबोधित केले. ममता बॅनर्जी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी केंद्राला जबाबदार धरताना दिसल्या. म्हणून त्यांनी असेही आश्वासन दिले की टीएमसी सरकार आल्यास बंगालच्या लोकांना विनामूल्य लसीकरण केले जाईल. राहुल-ममता नंतर पंतप्रधान मोदींनीही सर्व सभा रद्द केल्या आणि भाजपने सभेसाठी फक्त 500 लोकांची संख्या मर्यादित केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button