प. बंगाल : १ वाजेपर्यंत झाले ५५ मतदान

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election) निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येत मतदान सुरू आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ५५ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.

एकेकाळचे ममता बॅनर्जी याचे खास विश्वासू व सध्या भाजपाचे नेते सुवेंदु अधिकारी यांच्या भावाच्या कारवर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी हल्ला केला. ते गाडीत नसल्याने बचावलेत. कारच्या चालकाला किरकोळ जखमा झाल्या आहेत.

सकाळी ९ वाजेपर्यंतच १४. २८ टक्के मतदान झाले होते. मतदान शांततेत सुरू आहे. या पहिल्या टप्प्यात ३० मतदारसंघात मतदान होते आहे. यातील बहुसंख्य मतदारसंघ नक्षल प्रभावित क्षेत्रात आहेत. दुपारी उन्हातही मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांच्या रंग लागल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER