… म्हणून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी शिवसेनेचे मानले खास आभार

Shivsena-Mamta Banarajee

मुंबई :- पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2021) सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने आज आपल्या २९१ उमेदवारांची यादी घोषित केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) उपस्थित होत्या. यावेळी श्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देणारे तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन आणि शिवसेनेचे (Shivsena) मी आभार मानते, असे त्या म्हणाल्या .

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने तृणमूल काँग्रेससमोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्या पार्श्वभूमीवर काल शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये उमेदवार उभे न करण्याची घोषणा करत तृणमूल काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता.

यावेळी बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या देशातील विविध प्रादेशिक पक्षांचे आभार मानले. त्यात त्यांनी शिवसेनेचा विशेष उल्लेख केला.

दरम्यान शिवसेनेने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. ‘सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सगळे असा सामना आहे. सगळे एम, म्हणजेच मनी, मसल आणि मीडिया एकट्या ममतांविरोधात वापरले जात आहेत. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा आणि ममता दीदींसोबत ठामपणे उभं राहण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खऱ्या वाघीण आहेत, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले होते .

ही बातमी पण वाचा : मिथुन चक्रवर्ती भाजपात येणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER