पश्चिम बंगाल विधानसभा : काँग्रेससाठी गांधी परिवारासह ३० ‘स्टार’ नेते उतरणार मैदानात

महाराष्ट्रातील एकही नेता नाही

Gandhi Family - Maharastra Today

दिल्ली :- पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची प्रचार धुमाळी सुरू आहे. २७ मार्च रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपात मुख्य लढत होण्याचे संकेत आहे. काँग्रेसही मैदानात आहे. प्रचारासाठी काँग्रेसने ३० स्टार प्रचारकांनी यादी जाहीर केली. यात गांधी परिवारातील सोनिया, राहुल आणि प्रियंका तिन्ही नेत्यांचा समावेश आहे.

स्टार प्रचारकांत गांधी परिवाराशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खर्गे, अशोक गेहलोत, सचिन पायलट, नवज्योत सिंग सिद्धू, कमलनाथ, भूपेश बघेल, कॅप्टन अमरिंदर सिंग, मोहमद अझरुद्दीन यांचाही समावेश आहे. मात्र, यात महाराष्ट्रातील एकाही नेत्याचा समावेश नाही.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी २७ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर शेवटच्या आठव्या टप्प्यासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून २ मे रोजी इतर चार राज्यांसोबतच मतमोजणी होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER