इतके दिवस पोलीस झोपले होते का? सूडबुद्धीने माझ्याविरुद्ध कारवाई; प्रसाद लाड यांचा आरोप

Prasad Lad

मुंबई :- मुंबई महापालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावली. लाड यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले आहेत. हे प्रकरण २००९ मधील आहे. पोलिसांनी आता नोटीस पाठवण्याची गरज काय? इतके दिवस पोलीस झोपले होते काय? सूडबुद्धीने मला नोटीस बजावण्यात आली आहे, असा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे. (Prasad Lad has denied financial irregularities Allegations)

प्रसाद लाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील सर्व आरोप खोडून काढले. ते म्हणालेत, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने मला नोटीस पाठवल्याचे आताच कळले. ही तक्रार २००९ साली करण्यात आली होती. ‘बीव्हीजी’ आणि ‘क्रिस्टल’ने मिळून हे काम केले होते. आमचे काम समाधानकारक होते म्हणून पालिकेने आमचे डिपॉझिटही परत केले आहे. याचाच अर्थ यात काहीही भ्रष्टाचार झालेला नाही; शिवाय हे प्रकरण दहा वर्षांपूर्वीचे आहे. मग त्यावर आताच नोटीस देण्याची गरज काय? इतके दिवस पोलीस झोपले होते का?

कोर्टात जाणार

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत कुठेही माझे नाव नाही. हे सरकार फक्त आमच्या विरोधात कारवाया करते आहे. हा खोटा गुन्हा असून तो रद्द करण्यात यावा यासाठी मी कोर्टात जाणार आहे, असे ते म्हणालेत.

हा वाद दोन नेत्यांमधला आहे. २०१३ साली सत्यपाल सिंग यांनी ही केस ‘स्कॉश’ केली होती. मग ही केस परत का उघडण्यात आली, असा सवाल करतानाच आता मी या प्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा करणार नाही, असे लाड म्हणालेत. (prasad lad has denied financial irregularities Allegations)

पालिका घोटाळ्याच्या फायली देऊ?
इतर लोकांनी पत्रकार परिषदेत जशी उत्तरे दिली तसेही मी करणार नाही. मी माझ्या कामात नेहमीच यशस्वी झालेलो आहे. चौकशीच करायची असेल तर महापालिकेत अनेक घोटाळे झाले आहेत. तिथेही तपास करा. भाजपा नेते किरीट सोमय्या आणि खासदार मनोज कोटक कागदपत्रं घेऊन घोटाळे बाहेर काढत आहेत. तिथे कारवाई कधी करणार? उद्यापासून मीही पालिका घोटाळ्याच्या फायली द्यायला सुरुवात केली तर? असा टोमणा त्यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना मारला.

ही बातमी पण वाचा : स्वतः ईडी (ED) कार्यालयात पासपोर्ट जमा केला – विजय वडेट्टीवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER