सुप्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण

covid positive - bappi lahiri - Maharastra Today
covid positive - bappi lahiri - Maharastra Today

मुंबई :- पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) जगभरात पाय पसरवायला सुरुवात केली आहे. यामुळे सातत्याने कोरोना रुग्णात वाढ होत आहे. यातच, आता सुप्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बप्पी लहरी यांची कन्या रेमा बंसल म्हणाली की, आम्ही आवश्यक ती सर्व काळजी घेतली होती. तरीही त्यांना करोनाची लागण झाली. त्यांचे वय जास्त असल्यामुळे आम्ही त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्याचा विचार केला आहे. बप्पीदा यांच्या आरोग्याबाबत माहिती मिळताच चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button