पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयाचे पवारांकडून स्वागत, दिल्या शुभेच्छा

Sharad Pawar-PM Modi

मुंबई :- १५ ऑगस्ट २०२२ रोजी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल अहमदाबादमध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव‘ सुरू केला. केंद्र सरकारने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय पद्धतीने स्वातंत्र्यदिनाची ७५ वर्षे साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार (Sharad Pawar) यांनी शुक्रवारी स्वागत केले.

भारत सरकारने स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रम साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम संपूर्ण राष्ट्रामध्ये जन-उत्सव म्हणून साजरे करण्याच्या कल्पनेचे मी मनापासून स्वागत करतो. आझादी का अमृत महोत्सव संबंधित सर्व कार्यक्रम भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित केले जातील. आपल्या देशाच्या सन्मान आणि भव्य इतिहासाचे गौरव करणाऱ्या या उपक्रमात सहभागी असल्याने मला अत्यंत अभिमान वाटतो, अशी राष्ट्रभावनादेखील शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER