नाणारबाबत राज यांच्या भूमिकेचं स्वागत, योग्य वेळी सेनेचे नेतेही समर्थन करतील – फडणवीस

Devendra Fadnavis-Raj Thackeray-Uddhav Thackeray

मुंबई :- राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबत (Nanar project) घेतलेली भूमिका योग्य असून आम्ही त्याचे स्वागत करतो. शिवसेनेच्या काही नेत्यांना संधी मिळाल्यास तेदेखील मोकळेपणाने नाणार प्रकल्पाला दर्शवतील देतील, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी केले. तसेच नाणार प्रकल्पाचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी रत्नागिरीच्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे पूर्णपणे समर्थन केले. मला राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पत्र मिळाले आहे. त्यांची भूमिका अगदी योग्य आहे. अनिल काकोडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या सर्व शंका दूर झाल्या आहेत. ते या प्रकल्पाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी मदत करणार आहेत. ही ग्रीन रिफायनरी आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ज्या भागात अशाप्रकारचे रिफायनरी प्रकल्प असतात तेथील उत्पन्नात वाढ झाली आहे. . गुजरातमध्ये हे सिद्ध झालं आहे. आर्थिक उलाढाल वाढल्याशिवाय रोजगार उपलब्ध करुन देणे शक्य नाही. नाणार रिफायनरी ही राज्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे. याचा निवडणुकीशी काडीमात्र संबंध नाही. लोकांचा पाठिंबा असेल तर आम्ही हा प्रकल्प उभारण्यासाठी लढा देण्यास तयार आहोत, असे शिवसेना म्हणते. मुळात लोक मोठ्याप्रमाणावर या प्रकल्पासाठी जमिनी देण्यासाठी तयार झालेले आहेत. शिवसेनेच्या अनेक नेत्यांना मोकळेपणाने बोलायची संधी दिल्यास ते या प्रकल्पाचे समर्थनच करतील, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंनी शिवसेनेचे आव्हान स्वीकारले, आज थेट नाणार प्रकल्पग्रस्तांशी भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER