मुलींच्या लग्नाचं वय २१ करण्याच्या निर्णयाचं स्वागत : चित्रा वाघ

Chitra Wagh

मुंबई : मुलींच्या लग्नाच्या वयाचा पुनर्विचार करण्यासाठी केंद्र सरकारनं टास्क फोर्स तयार केली आहे. मुलींच्या लग्नाचं वय १८ वरून २१ केलं जाण्याच्या निर्णयाचं स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी दिली.

मुलींच्या लग्नाचे वय निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. ही समिती मुलींचे लग्नाचे वय ठरवण्यासाठी सरकारला शिफारसी सादर करील.

विवाहासाठी मुलींचे किमान वय सध्या १८ वर्षे आहे. पूर्वी ते १५ होते. मात्र, मुलींचे शारीरिक पोषण योग्य पद्धतीने व्हावे आणि मातामृत्यूंचे प्रमाण कमी व्हावे या हेतूने मुलींच्या विवाहाचे वय सरकरने वाढविले आहे . हा निर्णय महिलांना न्याय देणारा आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या .


 

 दरम्यान सन १९२९च्या हरविलास सारडा (तत्कालीन शिक्षणतज्ज्ञ) कायद्यानुसार मुलींचे लग्नाचे किमान वय १४ आणि मुलांचे १८ वर्षे ठरवण्यात आले होते. सन १९७८ मध्ये या कायद्यात सुधारणा करून ते अनुक्रमे १८ आणि २१ वर्षे असे वाढवण्यात आले. बदलत्या काळानुसार आता त्यातही बदल करण्याची आवश्यकता आहे, असे सीतारामन यांनी सूचित केले.