कंगनाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर ‘वेलकम टू मुंबई’ ‘ट्रेंडिंग’

welcome-to-mumbai-trends-on-twitter-as-kangana-ranaut

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई (Mumbai) पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते . कंगनाच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेने तिचा चांगलाच समाचार घेतला. यावर मुंबई कुणाच्या बापाची नाही, ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे. हिंमत असेल तर अडवून दाखवा, असे खुले आव्हान कंगनाने शिवसेनेला दिले आहे.

यावरून चांगलेच वादंग पेटले आहे. सोशल मीडियावर एका ग्रुपने कंगनाला पाठिंबा दर्शवत ‘वेलकम टू मुंबई’ ‘ट्रेंडिंग’ सुरू केली आहे . दरम्यान शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी कंगनाला मुंबईत येऊन दाखवण्याचं आव्हान दिलं होतं. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी तर कंगना मुंबईत आल्यास शिवसेनेच्या रणरागिणी तिचं थोबाड फोडतील, असा आक्रमक इशारा दिला होता. त्यामुळे आज नेमके काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER