
लातूर : काही दिवसांपूर्वीच रेल्वे मंत्रालयाने पुण्याऐवजी लातूर मार्गे दीक्षाभूमी एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय जाहीर केला. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शुक्रवारी दीक्षाभूमी एक्सप्रेस लातूर रेल्वेस्थानकात आली. यावेळी या रेल्वेचे स्वागत केले. या स्वागतात आमदार, खासदारांची उपस्थिती होती.
दीक्षाभूमी एक्सप्रेस पुणे, दौंड, औरंगाबाद मार्गे जात होती. नवीन मार्ग अंदाजे ४७५ किमीचे अंतर व्यापून १० ते १२ तास प्रवाशांच्या वेळेची बचत करेल. दोन वर्षांपूर्वी आमदार अभिमन्यू पवार आणि मध्य रेल्वे बोर्डाच्या सल्लागार समितीचे सदस्य श्यामसुंदर मानधना यांनी याची आठवण करून दिली. काही दिवसांपुर्वी अभिमन्यू यांच्या मागणीमुळे रेल्वे मंत्रालयाने ही रेल्वे लातूर मार्गे सोडण्याचा निर्णय घेतला. लातूर रेल्वेस्थानकावर शुक्रवारी रेल्वेचे आगमन झाले.
यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार कराड, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड व इतर पदाधिकारी होते. या सर्वांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाली. या रेल्वेमुळे लातूर उत्तर भारताशी जोडला गेला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला