गुढी उभा करून कृषी विधेयकाचे स्वागत करा : सदाभाऊ खोत

Sadabhau Khot

सांगली : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंदपर्व सुरू होणार आहे.२५ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी त्यांच्या शिवारामध्ये गुढी उभा करून हा आनंद व्यक्त करावा, असे आवाहन राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री, रयत क्रांती संघटनेचे नेते व भाजपाचे (BJP) आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केले आहे.

काँग्रेसच्या (Congress) सत्ताकाळामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक व्हावी, अशा पद्धतीची व्यवस्था राबवली गेली. बाजार समितीच्या एक तांत्रिक कारभारातून शेतकऱ्यांची लूट होत राहिली. अन्य सर्व क्षेत्रांमध्ये खुलेकरण करण्यात आले असताना, शेतकऱ्यांना मात्र त्याचा फायदा न देता बंधनाच्या जोखडात अडकवून त्याचे हित होणार नाही याची दक्षता घेतली. बाजार समितीच्या माध्यमातून राजकारण करून लाभ घेणाऱ्या विद्यमान सत्ताधाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाजार समितीचे समितीचा एकतंत्री कारभार मोडून काढून बाजाराचे खुलेकरण करण्याचा प्रयत्न मोडून काढला आणि शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली, असाही आरोप खोत यांनी केला.

केंद्र शासनाच्या विधेयकाचे स्वागत केले.शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक २०२० आणि शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक २०२० ही दोन्ही विधेयक मंजूर करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER