९ महिन्यात ४८ किलो वजन केलं कमी, पोलिस दलासमोर ठेवला आदर्श !

ASI Vibhav Tiwari

वाढतं वजन अनेकांच्या चिंतेचं कारण बनलंय. यामुळं उच्च रक्तदाब, मधुमेहासह हृदयासंबंधात अजार होऊ शकतात. युवा पिढीही याची शिकार होताना दिसतीये. दैनंदिन कामात वाढतं वजन बाधा टाकताना दिसतंय. वजन कमी करणं सोप्प नसलं तरी अशक्यही नाहीये. जर निश्चिय केला तर सारंच शक्य आहे. याचं उदाहरण छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्याचे एएसआय विभव तिवारांनी जगासमोर ठेवलंय.

एएसआय विभव तिवारी म्हणतात, “पोलिस कर्मचाऱ्याच्या आयुष्यात आरोग्याला खुप महत्व आहे. ते फिट नसतील तर त्यांचं कर्तव्यही त्यांना बजावता येत नाही. कामात खुप जास्त अडचणी येऊ शकतात.” एएसआय वैभव तिवारींनी 9 महिने प्रचंड मेहनत आणि तीव्र इच्छा शक्तीच्या बळावर १५० किलोहून १०२ किलोपर्यंत वजन कमी करुन दाखवलंय. ज्या वयात लोक म्हणतात की आता काहीच करणं शक्य नाही, त्या वयात त्यांनी ही किमया साधल्यामुळं युवकांसाठी ते प्रेरणास्त्रोत बनलेत.

वजनवाढीचा कामावर व्हायचा परिणाम
त्यांच वजन १५० किलोग्रॅम होतं. वाढत्या वजनामुळं अनेक अडचणींना दररोज त्यांना तोंड द्यावं लागायचं. त्यांचं काम मुख्य वाहतूक नियंत्रकाचं होतं. ट्राफिक संभाळताना त्यांना मोठे कष्ट घ्यावे लागायचे. कोरबा जिल्ह्यातल्या चौकांमध्ये सिग्नलवर काम करताना ते थकून जात. बिना गाडीचं एका ठिकाणाहून दूसऱ्या ठिकाणी जायला त्यांना वेळ अधिक लागायचा आणि थकवाही खूप जाणवायचा. २८ वर्षांपूर्वी जेव्हा ते पोलिस दलात भर्ती झाले होते तेव्हा त्यांचं वजन ६० किलो होतं. पण वेळेसोबत त्यांच्या अडचणी वाढत गेल्या. यामुळं त्यांना चालतानाही त्रास होवू लागला. पण मेहनत घ्यायच्या त्यांच्या तयारीमुळं ही अशक्य गोष्ट शक्य झाली.

त्यांनी अनेकदा वजन घटवण्याचा विचार केला पण ते करु शकले नव्हते. कर्तव्यावर असताना त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि सहकर्मचारी त्यांना वजन घटवण्याबद्दल वारंवार सल्ला द्यायचे. वेळेत वजन कमी केलं नाही तर त्याचा शारिरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होईल याबद्दलही सांगायचे. लॉकडाऊन काळात विभव यांनी वजन घटवण्याचा निश्चिय केला.

सर्वात आधी त्यांनी खाण्या पिण्याच्या सवयी बदलल्या. नऊ महिन्यात एकदाही ते हॉटेलमध्ये जेवले नाहीत. मिठाई आणि मैद्यापासून बनलेल्या सर्व गोष्टी त्यांनी बंद केल्या. फक्त घरी बनलेला आहार ते घेत असत.

आज त्यांच वजन १०२ किलो आहे. त्यांच्या कमरेची घेर आधी ५४ इंच होता आता तो ४२ इंच झालाय. वजन कमी झाल्यानंतरही ते आहारावर नियंत्रण ठेवून आहेत. आणि नियमीत व्यायम करताहेत.

९ महिन्यात घटवले ४८ किलो

सुरवातीच्या दिवसात त्यांनी खुप मेहनत घेतली पण काहीच परिणाम दिसत नव्हता. कमी जेवण आणि नियमीत चालण्याच्या सवयीमुळं त्यांची लाईफ स्टाईल पुर्णपणे बदलली होती. पण वजन घटत नव्हतं. नकारात्मक विचार त्यांच्या मनात यायचे. जेव्हाही हे काम अशक्य आहे असं त्यांना वाटायचं त्यादिवशी ते दुप्पट मेहनत घ्यायचे. असं करत त्यांनी ९ महिन्यात ४८ किलो घटवले.

आयजी रतनलाल डांगींची घेतली प्रेरणा
विभव यांना वजन कमी करण्याची प्रेरणा छत्तीसगडचे सिनियर आयजी रतनलाल डांगींकडून मिळाली. कर्तव्य बजावण्यासोबतच आयजी सोशल मिडीयावरुन फिटनेसबद्दल मार्गदर्शन करतात. सोशल मिडीया अकाउंट्सवरुन ते व्हिडीओच्या माध्यमातून वेगवेगळे व्यायाम प्रकार लोकांना सांगायचे.

याबद्दल विभव म्हणतात, ” या आधी कधीच न केलेलं काम आपल्याला नेहमी अशक्य वाटतं. मला लोक म्हणायचे की माझं वजन कमी होणं अशक्य आहे. पण मी त्यांच्या बोलण्याला कधीच गांभीर्यानं घेतलं नाही. वजन घटवताना असह्य वेदना व्हायच्या पण मी व्यायाम सुरुच ठेवला. आयजी साहेबांकडून प्रेरणा घेतल्यानं हे शक्य झालं.”

फिटनेसच्या मुद्द्यावर नेहमी पोलिस दलावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. पण एएसआय विभव तिवारींसारखे पोलिस कर्मचारी पोलिस दलाची ही प्रतिमा बदलू पाहताहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER