सांगलीत कोरोनमुळे आठवडी बाजार बंद

Bazzar Peth Ratnagiri

सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आठवडे बाजार व रस्त्यावर बसून विक्री बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेतला आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील वाढती कोरोना रूग्ण संख्या व कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता गर्दीची ठिकाणे टाळण्यासाठी सोमवार दि. १४ सप्टेंबर २०२० पासून महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आठवडे बाजार व रस्त्यावर बसून फळे, भाजीपाला व अन्य सर्व प्रकारची विक्री बंद करण्यात येत आहे. आठवडे बाजार भरलेला वा रस्त्यावर बसून विक्री होत असलेली आढळल्यास विक्रेत्याच्या सर्व वस्तू जप्त करून गुन्हा दाखल करण्यात येईल. भाजीपाला, फळे व अन्य वस्तू फक्त वाहनाद्वारे फिरून विक्री करता येतील. असे वाहन एका जागेवर उभे राहून विक्री करत असल्याचे आढळल्यास वाहनही जप्त करण्यात येईल, असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER