राज्यात वीकेंड लॉकडाऊनला सुरूवात; नवीन नियमावली जाहीर, काय सुरु, काय बंद?

Lockdown - maharastra Today

मुंबई : महाराष्ट्रात वेळेपूर्वीच वीकेंड लॉकडाऊनला सुरूवात झाली आहे. आज रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हा वीकेंड लॉकडाऊन असणार आहे. राज्यात रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात आला आहे. यादरम्यान कोणते निर्बंध लागू असणार? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार का? खासगी वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय? याची नियमावली राज्य सरकारकडून जारी करण्यात आली आहे.

आरटीपीसीआर ऐवजी रॅपिड अँटिजेन टेस्टला परवानगी

ज्यांचं लसीकरण झालेलं नसेल त्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक केल्या होत्या . तिथे आता पर्याय म्हणून रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यास परवानगी देण्यात आलीय. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आपले सरकार सेवा केंद्र, पासपोर्ट सेवा, सेतू केंद्र आठवड्यात सकाळी ७ ते रात्री ८ सुरू राहू शकतात. वृत्तपत्रांमध्ये मासिके, नियतकालिके, जर्नल्स यांचा देखील आवश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहेय.

वीकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार?

सुपरमार्केट, डी-मार्ट, बिग बाझार, रिलायन्स उघडे राहणार का ?

कोणतही ठिकाण जे अत्यावश्यक वस्तू विकत असेल ते ४ आणि ५ एप्रिलला सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत कोरोनाच्या कडक निर्बंधांसह सुरु राहणार आहे. जर ते विविध वस्तू ज्या अत्यावश्यक वस्तूंमध्ये येत नाहीत त्या विकत असतील तर ते बंद राहतील.

वीकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहील काय बंद राहणार ?

अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. कोणीही व्यक्ती महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू शकणार नाही.

एपीएमसी मार्केट विकेंड लॉकडाऊनध्ये सुरु राहणार का ?

होय.कोरोना नियमांचं पालन करत मार्केट सुरु राहणार, स्थानिक प्रशासनाला वाटलं की नियमांचं उल्लंघन होत आहे.तर, ते राज्य सरकारकडून परवानगी घेवून मार्केट बंद करु शकतात.

बांधकामासाठी वस्तू पुरवणारी दुकाने सुरु राहतील का ?

नाही

गॅरेज सर्विस,ट्रानस्पोर्ट वाहन दुरुस्ती सेवा सुरु राहणार? वाहनांचे स्पेअर पार्ट पुरवणारी दुकानं सुरु राहणार?

गॅरेज सुरु राहतील, स्थानिक प्रशासनानं तिथे कोरोना नियमांचं पालन केलं जातेय का ते पाहावे. ऑटो पार्ट पुरवणारी दुकानं बंद राहतील.

केंद्र सरकार, पब्लिक सेक्टरमधील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येतात का?

केंद सरकारच्या सार्वजनिक सेवा क्षेत्रातील कंपन्यांचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा पुरवठादार म्हणून समजले जाणार नाहीत. मात्र, ज्या सेवा अत्यावश्यक सेवेत गणल्या जातात त्यांना यातून सूट असेल.

नागरिक दारु विकत घेऊ शकतात का?

४ एप्रिलच्या शासन निर्णयानुसार नागरीक दारु होम डिलिव्हरी पद्धतीनं खरेदी करु शकतात. मात्र, निश्चित करण्यात आलेल्या वेळेतचं दुकानांकडून सेवा दिली जाईल. मात्र स्थानिक उत्पादन शुल्क विभाग याबाबतचे आदेश देतील.

दारुची दुकानं खुली असणार का?

नाही

रस्त्याशेजारील ढाबे खुले असणार का?

ढाबे सुरु असतील मात्र, तिथे देखील टेक अवे होम आणि होम डिलीव्हरी पर्याय उपलब्ध असेल.

इलेक्ट्रिक उपकरणाची दुकानं सुरु राहणार का?

एसी. कुलर, फ्रीज दुरुस्ती दुकानं सुरु नसतील. लॅपटॉप, मोबाईल, कॉम्प्युटरची दुकानं बंद असतील.

सेतू कार्यालय, नागरीक सेवा केंद्र सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु असतील. रेस्टॉरंट आणि बार स्थानिक प्रशासनान लावलेल्या नियमांसह सकाळी ७ ते सायंकाळी ८ पर्यंत फक्त पार्सल सुविधेसह सुरु असतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button