दिल्लीत वीकेंड कर्फ्यू : मॉल, जिम बंद; अरविंद केजरीवाल यांची घोषणा

नवी दिल्ली :- कोरोना (Corona Virus) रुग्णसंख्या वाढत असल्याने दिल्लीत वीकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वीकेंड कर्फ्यू (Weekend curfew) लावल्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केली. ही घोषणा अरविंद केजरीवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केली.

दरम्यान कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असणार आहे. आधीपासूनच नियोजित लग्नासारख्या महत्त्वाच्या गोष्टींना कर्फ्यूच्या माध्यमातून परवानगी असेल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

कर्फ्यूमध्ये सभागृह, मॉल, जिम आणि स्पा बंद असणार आहेत. तर चित्रपटगृहांना ३० टक्के प्रेक्षक क्षमतेसह सुरू ठेवण्याची परवानगी आहे. तसेच होम डिलिव्हरीचीही परवानगी आहे. आठवडी बाजारांना परवानगी आहे. मात्र, त्यांना निर्बंधाचे पालन करावे लागेल. लग्नासाठी जाणाऱ्यांना ई-पास दिला जाईल, अशी माहिती यावेळी केजरीवाल यांनी दिली.

“हे सर्व निर्बंध तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी आहेत. यामुळे थोडी अडचण होईल पण कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी हे निर्बंध गरजेचे आहेत.” असे केजरीवाल यांनी सांगितले. याचबरोबर दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांसाठी बेडची कमतरता नाही, अशीही माहिती यावेळी त्यांनी दिली. तसेच सार्वजनिक ठिकाणी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करणार असल्याचे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button