आठवडाभर लॉकडाऊन; यशोमती ठाकूर यांची घोषणा

yashomati thakur

अमरावती : महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी येत्या सोमवारपासून लॉकडाऊनची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन संध्याकाळी ८ वाजेपासून असणार आहे. हा लॉकडाऊन (Lockdown) सात दिवसांसाठी आहे. विशेषतः राज्यात अनलॉकनंतर हा पहिला लॉकडाऊन असणार.

या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना १४ दिवसांपर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नाही, असे आदेश प्रशासनाने दिले आहे. या ठिकाणी बॅरिकेट्स लावले आहेत. या १२ प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सर्वांत जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला.

अमरावतीत २,७८३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
अमरावती मनपा हद्दीत सध्या २ हजार ७८३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. या शहराला कोरोनाने पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे, अशी माहिती मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. आज जिल्ह्यात तब्बल ७२७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. २ हजार १३१ रुग्णांच्या टेस्ट झाल्या. जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर ३४.११ टक्क्यांवर पोहचला. एकूण ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ४६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा सर्वांत मोठा हॉटस्पॉट ठरला आहे. यात ३५९ रुग्ण आहेत, अशी माहिती उपचार उपविभागीय अधीकार्‍यांनी दिली. अचलपूर परतवाडाच्या घरोघरी रुग्ण आढळत असल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे, असे खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER