खलिस्तानवादी १२ संघटनांच्या वेबसाइट्‌स केल्या बंद

PM Modi

नवी दिल्ली : खलिस्तानचा (Khalistan) पुरस्कार करणाऱ्या 12 वेबसाइट केंद्र सरकारने बंद केल्या आहेत. यातील काही वेबसाइट खलिस्तानवादी संघटनांकडूनच चालवल्या जात होत्या. त्यात शीख फॉर जस्टीस नावाच्या संघटनेचाही समावेश आहे.

इलेक्‍ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशानुसार आयटी ऍक्‍टच्या कलम ६९ ए अंतर्गत या वेबसाइट्‌स बंद करण्याचा आदेश देण्यात आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिली.

केंद्र सरकारचे (Central Government) हे मंत्रालय सायबर स्पेसमधील कंटेटवर लक्ष ठेवून असते. या मंत्रालयाला आक्षेपार्ह कंटेट किंवा पोस्ट तसेच वेबसाईट बंद करण्याचा अधिकार आहे.

केंद्र सरकारने ‘शीख फॉर जस्टीस’ या संघटनेवर मागच्यावर्षीच बंदी घातली आहे, पण, त्याच नावाने त्यांची वेबसाईट मात्र सुरू ठेवण्यात आली होती. या संघटनेशी संबंधित चाळीस वेबसाइट गेल्या जुलै महिन्यात बंद करण्यात आल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER