पर्यटनाच्या ‘दिशेला’ जाताना जीन्स घालावी, सरकारी कामकाजात नव्हे, भाजपचे आदित्यला चिमटे

Aaditya Thackeray - Acharya Tushar Bhosale

मुंबई : मंत्रालयात काम करणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि कंत्राट कर्मचाऱ्यांना पोषाखाबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. या नव्या सूचनेनुसार मंत्रालयात आता जीन्स, टी शर्ट घालता येणार नाही. तसंच मंत्रालयात स्लीपर्स वापरू नये, असंही नव्या नियमांत म्हटलं आहे.

महिलांनी साडी, सलवार चुडीदार, पॅन्ट, ट्राउझर आवश्यकता असल्यास दुपट्टा घालवा. तर पुरुषांनी शर्ट पॅन्ट, ट्राउझर घालावे, असं जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमुद करण्यात आलं आहे.

यावरूनच भाजप (BJP) नेते यावरून भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पोशाखाबाबत राज्य शासनानं नुकताच घेतलेला निर्णय स्वागतार्हच आहे. मात्र, शासकीय यंत्रणांचे प्रमुख असलेल्या मंत्र्यांना सुद्धा हा निर्णय बंधनकारक असावा. राज्याच्या पर्यटनमंत्र्यांनी खासगी पर्यटनाच्या ‘दिशेला’ जाताना जीन्स घालावी, सरकारी कामकाजात नव्हे, अशा शब्दांत आचार्य तुषार भोसले यांनी लगावला आहे.

दरम्यान, शासनाच्या नियमांत मंत्रालयात काम करणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि कंत्राट कर्मचाऱ्यांना पोषाखाबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. या नव्या सूचनेनुसार मंत्रालयात आता जीन्स, टी शर्ट घालता येणार नाही. तसंच मंत्रालयात स्लीपर्स वापरू नये, असंही नव्या नियमांत म्हटलं आहे.

महिलांनी साडी, सलवार चुडीदार, पॅन्ट, ट्राउझर आवश्यकता असल्यास दुपट्टा घालवा. तर पुरुषांनी शर्ट पॅन्ट, ट्राउझर घालावे, असं जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमुद करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER