सरकारमधील कमकुवत नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव; माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची केंद्रावर टीका

Raghuram Rajan

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) दुसर्‍या लाटेला नकळत देशाचा कहर केला. वाढती रुग्णसंख्या सरकारी यंत्रणेच्या बेजबाबदारपणाची साक्ष देत आहेत. सरकारमधील कमकुवत नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव याचा परिपाक म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाचे नुकसान केले आहे, अशी टीका माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत सरकार आधीपासूनच सतर्क असते, तर त्यांनी नियोजन केले असते. सरकारने जगाकडे लक्ष दिले असते तर कदाचित आज कोरोनासारखी वाईट परिस्थिती ओढवली नसती. उदाहरणार्थ ब्राझीलमधल्या परिस्थितीतून बोध घेऊन सरकारने आणखी तयारीनिशी सज्ज रहाणे आवश्यक होते, असे रघुराम राजन यांनी म्हटले आहे.

“कोरोनाच्या पहिल्या लाटेवर नियंत्रण मिळवल्यावर सरकारी यंत्रणा आत्मसंतुष्ट बनली आणि तिथेच घात झाला. मात्र, यावेळी तीनपटीने वाढ झाली आहे. सलग १३ दिवस देशातील दैनंदिन रुग्णसंख्या सरासरी ३ लाखांच्या पुढे आहे. लसीकरण मोहिमेत निर्माण झालेल्या अडथळ्यांनी कोरोनाची दुसरी लाट आणखी घातक बनली आहे. आजच्या घडीला भारतात मृत्यूदर सर्वाधिक आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे. कोरोनाचे वाढते संकट पाहता अनेक औद्योगिक संघटनानी देशव्यापी लॉकडाऊनची मागणी सरकारकडे केली आहे. ऑक्सिजनअभावी बऱ्याच रुग्णांना प्राण गमवावे लागले. संपूर्ण देशातभारत दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना ५ राज्यांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती.” असे रघुराम राजन म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button