आम्हीच जिकणार, सत्तांतराचा प्रश्नच नाही – डोनाल्ड ट्रम्प

Donald Trump

वॉशिंगटन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवडणूक ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)त्यांच्या विजयाचा विजयाचा विश्वास व्यक्त करताना म्हणाले – आम्हीच जिकणार (We will win), सत्तांतराचा प्रश्नच नाही!

ट्रम्प निवडणूक हारले तर सहजासहजी सत्ता सोडतील की नाही यावर अमेरिकेत तर्क-वितर्क सुरु आहेत. बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रपरिषदेत ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही निवडणूक हारले तर सत्तेचे हस्तांतरण शांततेत होईल का?

यावर, इ-मेल मतपत्रिकेने मतदाना ( (मेल-इन-बैलेट) बाबत नापसंती व्यक्त करताना ट्रम्प म्हणालेत – हा अनर्थकारक प्रकार आहे. याबाबत मला संशय आहे हे मी नेहमी सांगत आलो आहे. काय होते ते आम्ही पाहू. यावर त्यांना पुन्हा प्रश्न करण्यात आला की, लढत निकराची आहे. तुम्ही हारले तर शांततेने व्हाईट हाऊस सोडणार का? यावर सरळ उत्तर न देता ते म्हणाले – आम्हीच जिंकणार आहोत त्यामुळे सत्तांतराचा प्रश्नच येत नाही. मात्र, इ – मेल किंवा पोस्टाने मतदान ही व्यवस्था संपली पाहीजे.

ट्रम्प यांच्या ‘आम्हीच जिकणार, सत्तांतराचा प्रश्नच नाही’ या उत्तरावर प्रतिक्रिया देताना माजी राष्ट्राध्यक्ष व डेमोक्रेटिक पार्टीचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बाइडेन म्हणाले – त्यांनी तर्कहीन उत्तर दिले आहे. यावर काय बोलावे हे समजत नाही.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत – तुमचा पराभव झाला तर, या प्रश्नाच्या उत्तरात ट्रम्प म्हणाले होते, त्यावेळी पाहू ! ट्रम्प यांच्या अशा उत्तरांमुळे, ट्रम्प निवडणूक हारले तर सत्तांतर सुरळीत होणार का? हा प्रश्न वारंवार उचल खातो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER