आम्ही लस घेणार, तुम्हीही घ्या : वैद्यकीय संघटनांचे आवाहन

medical associations

कोल्हापूर :- ‘लसीकरणात प्रथम आम्ही लस घेऊ; न घाबरता स्वत:च्या सुरक्षिततेसाठी तुम्हीही लस घ्या.’ असे आवाहन खासगी वैद्यकीय संघटनांचे अध्यक्ष, प्रतिनिधी, डॉक्टर्स यांनी आज केले. जिल्ह्यात होणाऱ्या कोविड लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दौलत देसाई (Daulat Desai) यांच्या अध्यक्षतेखाली खासगी वैद्यकीय संघटनांचे अध्यक्ष, डॉक्टर्स, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. जिल्हाधिकारी देसाई यावेळी म्हणाले, शनिवारी सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागाने लसीकरण यशस्वी करू. यानंतरचा दुसरा, तिसरा टप्पाही आपण सर्वांनी यशस्वी करण्यासाठी आपल्या स्तरावरून जनजागृती करावी. स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या  सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे.

लसीकरण यशस्वी करण्याचा निर्धार डॉक्टर संघटनांनी केला. बैठकीला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, रोटरी क्लबचे सदस्य डॉ. आर. ए. पाटील, मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, जमाते उलेमाचे अरिफसाहेब हवलदार, सिटी लायन्स आय हॉस्पिटलचे सचिव नरेंद्र पाध्ये, डॉ. अनिता सयबन्नावर, निमाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद मोकाशी आदी उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : 31 जानेवारी पूर्वी लाभार्थी रेशनकाडवरील सर्व व्यक्तींचे आधार सिडींग होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER