“फासा आम्हीच पलटणार” : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई :- विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मित्र आहेत, पण ते काहीही बोलतात, असा टोला काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला. ऑपरेशन लोटस वगैरै काहीही होणार नाही. भविष्यात भाजप (BJP) पक्षाचे नावदेखील राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, फासा आम्हीच पलटणार. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल,” असे विधान फडणवीस यांनी ५ फेब्रुवारीला केले होते.

पटोले यांनी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही (Farmers Protest) भाष्य केले. “देशातील सेलिब्रिटींना सरकारच्या बाजूने आता‌ ट्विट करता येते, पण त्यांना जनतेच्या प्रश्नांवर ट्विट करता येत नाही,” असे म्हणत क्रिकेटपटू आणि सिनेतारकांना धारेवर धरलं.

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शिवसेनेला (Shiv Sena) मुख्यमंत्रिपदाचे आश्वासान दिले नव्हते, असे वक्तव्य करून महाराष्ट्रात खळबळ उडाली. शाहांच्या वक्तव्यावर बोलताना, “भाजप आणि शिवसेनेत‌ काय बोलणं झालं, हे मला माहिती नाही. शाह तब्बल एका वर्षांने बोलले आहेत. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ आहे का?” असा सवाल करत शाहांच्या वक्तव्याची पटोले यांनी खिल्ली उडवली.

ही बातमी पण वाचा : शीख समाजाचे देशासाठी मोठे योगदान – मोदी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER