धनखर यांचा कार्यकाळ संपताच त्यांना तुरुंगात पाठऊ, ममताच्या खासदाराने दिली धमकी

Dhankhar - Kalyan Banerjee - Maharashtra Today

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जींची सत्ता आल्यानंतर राज्यपाल आणि सरकार यांच्यातला वाद शिगेला पोहोचला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यपालांना तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली! धनखर यांचा कार्यकाळ संपताच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करू आणि त्यांना तुरुंगात पाठऊ, असे म्हणालेत.

हुगळी येथील एका कार्यक्रमात कल्याण बॅनर्जी म्हणालेत की, जगदीप धनखर राज्यपालपदी असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करता येत नाही. त्यांचा कार्यकाळ संपताच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल आणि त्यांना तुरुंगात पाठवले जाईल. तृणमूल काँग्रेस समर्थक राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध धार्मिक हिंसा भडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करतील. तसेच, भाजपाकडून राजकारण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात अभियोगही दाखल केला जाईल. २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यपाल जगदीप धनखर यांच्यासह भाजपाचे अनेक दिग्गज नेते तुरुंगात असतील. त्यांच्या या विधानाचा व्हीडीओ राज्यपाल धनखर यांनी ट्वीट केला आहे. कल्याण बॅनर्जी यांचे विधान धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.

नारदा गैरव्यवहार प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या अटकेसाठीही कल्याण बॅनर्जी यांनी राज्यपाल धनखर यांना जबाबदार धरले आहे. हा राज्यपालांनी रचलेला कट आहे, असा आरोप केला. पंतप्रधान देशातील जनतेची सुरक्षा करण्यास अकार्यक्षम ठरले आहेत, अशी टीका केली.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button