काँग्रेस सत्तेत आल्यानंतर काळे कृषी कायदे रद्द करू- राहुल गांधी

Rahul Gandhi

मोगा : देशभरातील शेतकऱ्यांचा विरोध असतानाही केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे आणले. हे कायदे काँग्रेस सत्तेत आल्यास रद्द करू, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंजाबमधील जनतेला दिले. ते पंजाबमधील मोगा येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘शेती वाचवा यात्रे’त बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, मी तुम्हाला खात्री देतो की, ज्या दिवशी काँग्रेस (Congress) पार्टी सत्तेत येईल, आम्ही हे तिन्ही काळे कायदे मोडीत काढू आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ. या कायद्याना पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक विरोध असून त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे.

राहुलने आरोप केला की– हा सर्व प्रकार शेतकऱ्यांची जमीन आणि पैशाबाबतचा आहे. पहिल्यांदा मी हा प्रकार भठ्ठा परसौलमध्ये पहिला. ते शेतकऱ्यांची जमीन हिसकावून घेत होते. आम्ही भूमिअधिग्रहण कायदा बदलला आणि तुमच्या जमिनीचे रक्षण केले. बाजाराच्या दरापेक्षा चारपट जास्त दर दिला. मोदी आले आणि त्यांनी आमचा नवा कायदाच बदलून टाकला. शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी आम्ही संसदेत लढलो होतो. सरकारचा शेतकऱ्यांना संपवण्याचा डाव आहे.

सध्याचे सरकार हे कळसूत्रीच्या बाहुल्यांप्रमाणे काही मूठभर लोकांच्या तालावर नाचते आहे. पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी भारताला खाद्य सुरक्षा दिली. आमच्या सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती, पीक खरेदी आणि बाजाराची रचना तयार केली होती. मोदी सरकार ती संपवण्याचा प्रयत्न करते आहे. काँग्रेस हे होऊ देणार नाही, असा विश्वास राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER