मागच्या सरकारसोबत सूडबुद्धीने वागणार नाही : जयंत पाटील

Jayant-Patil-

पुणे :- जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला उत्तर देताना म्हटले आहे की चुकलेल्या गोष्टी निदर्शनास आल्या तर निर्णय घेऊ. मात्र मागच्या सरकारच्या मागे लागणे अशा सूडबुद्धीने आम्ही वागणार नाही. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून फक्त योजना बंद करत सुटल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. होता. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते.

मनसेने काढली वारिस पठाणची अंतयात्रा

आम्हाला विश्वास आहे की केंद्र सरकार राज्याकडे दुजाभावाने बघणार नाही, असे सांगताना जयंत पाटील म्हणाले, शेवटी महाराष्ट्र भारतातले राज्य आहे. केंद्र आणि राज्यात संवाद असण्याची गरजही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. जलयुक्त शिवाराच्या योजनेला स्थगिती नाही. पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मागील सरकारने स्वत: च्या सोयीसाठी काम केले आहे. त्यामुळे अत्यंत सुमार कामे झाली असल्याचे पाटलांनी म्हटले आहे. दरम्यान, सरकार जाणीवपुर्वक विकासांच्या कामाला खिळ घालत आहे. त्यामुळेच ते फक्त योजना बंद करत सुटले असल्याची टीका भाजपकडून केली जात आहे.