…तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत? भाजप नेत्याने दिले ‘हे’ उत्तर

BJP - NCP - Shiv Sena - Raosaheb Danve

मुंबई :- शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का, याबद्दल राजकीय वातावरणात उलटसुलट चर्चा आहे.

राज्यात सुरू असलेल्या या घडामोडींबद्दल भाजपचे (BJP) माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) भाष्य केले . फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं ते म्हणाले. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यास शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत, असा प्रश्न दानवेंना विचारण्यात आला. त्यावर आम्हाला सत्ता स्थापनेची कोणतीही घाई नाही. हे सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही करणार नाही, असे दानवे यांनी म्हटले .

राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीची आठवण करून देताच दानवेंनी भाजपकडे असणाऱ्या संख्याबळाकडे लक्ष वेधलं. “विधानसभा निवडणुकीनंतर भाजपकडे सर्वाधिक जागा होत्या. मात्र सत्ता स्थापनेसाठी त्या पुरेशा नव्हत्या. त्यामुळे एखादा आमदारांचा मोठा गट आमच्यासोबत येतो का ते आम्ही पाहिले. त्यातूनच पहाटेचा शपथविधी झाला. मात्र तो प्रयत्न अपयशी ठरला. आता महाविकास आघाडीचे सरकार पडल्यास आम्ही सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार नाही. कारण त्यासाठी आवश्यक असणारे संख्याबळ आमच्याकडे नाही.” असे दानवेंनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER