‘आपली जबाबदारी केंद्रावर ढकलून चालणार नाही’, पंकजा मुंडेंनी राज्य सरकारला खडसावले

pankaja Munde - Uddhav Thackeray - Maharashtra Today
pankaja Munde - Uddhav Thackeray - Maharashtra Today

मुंबई :- लसीकरणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आणि अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मात्र लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी ठाकरे सरकारला काही सूचना केल्या आहेत. सोबतच आपली जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलून चालणार नाही, असे म्हणत खडसावलेही. जास्तीत जास्त लसीकरण केंद्र आणि कमीत कमी अवधी या सूत्रानेच लसीकरण मोहीम यशस्वी होईल, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच १८ वर्षांवरील व्यक्तीचं लसीकरण करण्याचा दिलेला शब्द पाळा, केंद्रावर जबाबदारी ढकलून चालणार नाही, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी सरकारला खडसावले.

पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन काही सूचना केल्या आहेत. अधिकाधिक लसीकरण केंद्र कमीत कमी अवधी या सूत्रानुसार मोहीम राबवावी. लसींचं उत्पादन करणे, साठा बनवणे, तापमान नियंत्रित करणे यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे लागेल, असं पंकजा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावेळी त्यांनी #VaccineForAll हा हॅशटॅगही वापरला आहे.

ही बातमी पण वाचा : दोन केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांना ऑक्सिजन संयंत्रे उभारण्याचा आदेश

१ मे रोजी सेकंड डोस उपलब्ध करून देणे सरकारसाठी बांधील आहे. तसा शब्द सरकारने जनतेला दिला आहे आणि तो पाळलाच पाहिजे. केवळ केंद्र सरकारवर जबाबदारी टाकून चालणार नाही. राज्याचे व्हॅक्सीन, रेमडेसिवीरचे ऑडिट आणि दैनंदिन वार्तापत्रं झाले पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. जेष्ठ नागरिक आणि लसीचा दुसरा डोस घेणार्‍या लोकांचे वेगळे नियोजन आणि १८ ते ४४ वयोगटांतील लोकांचे वेगवान नियोजन करावे लागेल. लसीकरण होताना विलंब दिरंगाई होता कामा नये. रेमडेसिवीर सारखे वाटप अन्यायकारक होऊ नये हे अत्यंत महत्वाचे आहे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

१८ ते ४४ वयाच्या नागरिकांना मोफत लस देणे ही घोषणा महत्त्वाकांक्षी आणि तितकीच स्वागतार्ह आहे. लस मिळवण्यासाठी आणि सुरळीत लसीकरण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन हे मोठे आव्हान आहे, असं सांगतानाच जनतेचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या आव्हानांना पेलण्यासाठी यंत्रणांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button