खळबळ! मी प्रेम आणि प्रेमविवाह करणार नाही! विद्यार्थिनींना दिली शपथ

Amravati girls College

अमरावती : ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हटले की प्रेम व्यक्त करण्याचा दिवस! मात्र, याच ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला एका महाविद्यालयातील विद्यार्थिनींना प्रेमात न पडण्याची शपथ देण्यात आली आहे.

मी प्रेम करणार नाही, प्रेमविवाहही करणार नाही, अशी शपथ त्यांना देण्यात आली आहे.

हा इंटरव्ह्यू घरी आईने बघू नये, ‘व्हॅलेंटाईन’च्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचे उत्तर

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महिला व कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना ही शपथ देण्यात आली. विदर्भ यूथ वेलफेयर सोसायटीतर्फे या महाविद्यालयाचे संचालन केले जाते. चांदूर रेल्वे तालुक्यात टेंभूर्णी येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर सुरू असून, त्यामध्ये हा प्रकार घडला. याबाबत आयोजक म्हणाले की, सध्याचे वातावरण बघता आम्ही हा उपक्रम राबविला. हुंडा न घेणार्‍या मुलाशी लग्न न करण्याची आणि होणार्‍या सुनेकडून हुंडा न घेण्याची शपथही आम्ही या मुलींना घ्यायला लावली आहे. आम्ही या शिबिरात हिंगणघाट पीडितेला श्रद्धांजली अर्पण केली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, प्रेम न करण्याची शपथ देण्याचा प्रकार आज पुढे आल्यानंतर, खळबळ माजली आहे. विविध प्रतिक्रिया उमटणेही सुरू झाले आहे.