वेळ पडल्यास बेळगावात जाऊन आंदोलन करू; मात्र विरोधी पक्षाच्या नेतृत्वात- संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई :- बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेपासून तर राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. “महाराष्ट्र सरकारने राजकारण न करता विरोधी पक्षनेत्यांना विश्वासात घ्यावं. वेळ पडली तर त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे बेळगावात जाऊन आंदोलन करायला तयार आहोत. ते यायला तयार आहेत का विचारा.” अशी उद्विग्न प्रतिक्रिया शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगावातून रात्रीच्या वेळी पोलिसांनी ज्या पद्धतीने हटवला, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. मात्र याबाबत विरोधी पक्ष काहीही बोलण्यास तयार नाही. चार दिवसांपूर्वी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. त्यांचंच सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये रात्रीच्या वेळी, दिवे बंद करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला जातो, हे कसले लक्षण? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात तत्काळ लक्ष घालावे. राजकारण न करता या राज्यातल्या विरोधी पक्षाच्या प्रमुखांना म्हणजेच विरोधी पक्ष नेत्यांना विश्वासात घ्यावं. वेळ पडली तर त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे बेळगावात जाऊन आंदोलन करण्यास तयार आहोत. ते यायला तयार आहेत का विचारा, असेही राऊत म्हणाले.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER