धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा पाठपुरावा करू : खासदार संभाजीराजे छत्रपती

Shambhaji Raje

कोल्हापूर :- आज धनगर समाज आरक्षण समन्वय समितीच्या गोलमेज परिषदेनंतर शिंदे यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली. धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी आज गोलमेज परिषद झाली. खासदार संभाजीराजे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा द्यावा, यासाठी माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. धनगर समाजाचे आणि छत्रपती घराण्याचा जिव्हाळा असल्याने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी माजी गृह राज्यमंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांना दिले.

खा. संभाजीराजे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी (Rajashree Shahu Maharaj) बहुजन समाजाची व्याख्या केली होती, त्यामध्ये धनगर समाजाचाही समावेश होता. त्यामुळे मराठा समाजाप्रमाणेच धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करणे ही आमची जबाबदारी आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी पहिला आंतरजातीय विवाह आपल्या जनक घराण्यातील बहीण चंद्रप्रभा घाटगे यांचा केला. धनगर समाजातील यशवंतराव होळकर (Yashvanrao Holkar) यांच्याशी त्यांनी चंद्रप्रभा यांचे लग्न लावून दिले. तेव्हापासून आमच्या घराण्याची नाळ धनगर समाजाशी जोडली गेली आहे. धनगर समाजाच्या प्रगतीसाठी राजर्षी शाहू महाराजांनी प्रयत्न केले.

त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करणे ही छत्रपती घराण्याची जबाबदारी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मी प्रयत्नशील आहे तसेच धनगर समाजाच्या आरक्षणासाठीही मी प्रयत्न करेन, असे आश्वासन खा. संभाजीराजे छत्रपती यांनी दिले.

ही बातमी पण वाचा : संभाजीराजे पाठिंबा द्या, बारा हत्तींचं बळ मिळेल; गोपीचंद पडळकरांचे  पत्र  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER