… तर देशालाही अभिमान वाटेल अशी कामगिरी करू- लष्करप्रमुख नरवणे

भारत - चीन सीमेवरील तणावाबाबत दिली ग्वाही

Narvane

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज आहे. गरज भासल्यास अशी कामगिरी करू ज्याचा फक्त लष्करालाच नव्हे तर देशालाही अभिमान वाटेल, अशी ग्वाही लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी दिली.

लद्दाखमध्ये सुरू असलेल्या चीनच्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी लद्दाखचा दोन दिवसांचा दौरा सुरू केला. सैन्याच्या चीनला उत्तर देण्याच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, भारताचे लष्कर कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास सज्ज आहे.

पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळची स्थिती बदलण्याबाबत चीनच्या करवाईंच्या पार्श्वभूमीवर, लद्दाखमधील सुरक्षाविषयक स्थितीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी लद्दाखचा दोन दिवसांचा दौरा सुरू केला. आमचे अधिकारी आणि जवान जगातील सर्वोत्तम असून आम्ही फक्त लष्कर नाही तर देशालाही अभिमान वाटेल अशी कामगिरी करू, असे म्हणाले. मात्र, चर्चेतून वाद मिटेल असा विश्वास व्यक्त केला.

नरवणे म्हणाले की, “लेहमध्ये मी अनेक ठिकाणांना भेट दिली. अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जवानांचे मनोबल उंचावलेले असून सर्व आव्हानांचा सामना करण्यास ते समर्थ आहेत.

नियंत्रण रेषेवरील परिस्थिती थोडी तणावाची आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सैन्य तैनात करण्यात आले आहे. यामुळे आपली सुरक्षा आणि अखंडतेचं रक्षण होईल.”

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून चीनसोबत लष्कर तसंच राजकीय स्तरावर चर्चा सुरू आहे. सध्या चर्चा सुरू असून भविष्यातही सुरू राहतील- अशी माहिती त्यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER