महाराष्ट्रात चित्रपट आणि करमणूक क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक ते सर्व करू – मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray - Film And Entertainment Sector

मुंबई : जशी परवडणारी घरे ही संकल्पना आहे तसे परवडणारी सिनेमागृहे ही संकल्पना चांगली आहे. या उपक्रमाला कसे राबवायचे यावर अधिक विचार करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात चित्रपट आणि करमणूक क्षेत्र अधिक बळकट करून त्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी ज्या काही गोष्टी करण्याची गरज आहे ते करू. आज आपल्याकडे चित्रपटनिर्मितीसाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान उपलब्ध होणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीसाठी परदेशात जायची गरज नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिलं आहे.

तसंच, त्यांनी मधल्या काळात जी फिल्म इंडस्ट्री उत्तरप्रदेशात हलविण्यासंबंधी चर्चा होती त्यावरदेखील तिखट प्रतिक्रिया दिली आहे. मध्येच चर्चा सुरू झाली की इथली चित्रपटसृष्टी उत्तरप्रदेशला नेणार म्हणून, तुमच्यात क्षमता असेल तर जरूर नेऊन दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं. चित्रपट क्षेत्राशी संबधित वेबिनार कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, माझे वडील बाळासाहेब हे एक नेते होते; पण तेही एक व्यंग्यचित्रकार, कलाकारही होते. त्यांच्या कलेने, ब्रशने आपली ताकद वेळोवेळी दाखवून दिली होती. पूर्वीच्या प्रॉडक्शन हाऊसेस कलेचे काम करून घेण्यासाठी त्यांच्याकडे यायचे. मग ते राज कपूर, देवानंद असो किंवा दिलीप कुमार, राजेश खन्ना सारखे कलाकार आणि अगदी मोहम्मद रफी, मन्ना डे हे गायक तसेच चांगले संगीतकार यांची कायम आमच्याकडे ये-जा असायची. या सर्वांनी एक ऋणानुबंध जपला.

आज महाराष्ट्रात चित्रपटनिर्मिती होते तिचा दर्जा चांगला पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान हवे, आपल्याला जागा हवी असेल त्याप्रमाणे एक ऍक्शन प्लान बनवा. प्राधान्यक्रम ठरवा, आपण निश्चितपणे त्यावर काम करू. शेवटी हाही आमचा एक मोठा परिवार आहे. तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहात. त्यामुळे त्यांना बळ देणे हे सरकारचे काम आहे, अशी शाश्वती मुख्यमंत्र्यांनी दिली.

तसेच, उद्धव ठाकरे म्हणाले, आपण नेहमीच सर्व प्रसंगात राजकीय नेत्यांच्या बरोबर असता, कोरोनासारख्या संकटातदेखील सर्वच जण पुढे आले. चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी अभिनेते अमिताभ बच्चन आणि इतर दिग्गज अभिनेत्यांना घेऊन एक सुंदर आणि प्रभावी जनजागृती फिल्म तयार केली, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं (CM Uddhav Thackeray promise to Film Industry).

“फिल्म इंडस्ट्रीची गरज सर्वांना का लागते? कारण यातून काम करणारे जे कलाकार असतात त्यांना जनतेच्या हृदयात एक स्थान असते. हा एक उद्योग आहे असे आपण म्हणतो; पण याचे उत्पादन काय आहे? फिल्म इंडस्ट्रीचे प्रॉडक्शन हे चांगला समाज घडविणे हे असू शकते. महाराष्ट्रात सगळं काही आहे. महाराष्ट्रात संस्कार, कौशल्य, जिद्द आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER