उइगर मुसलमानांना योग्य पद्धतीने ‘धडा’ शिकवत राहू : शी जिनपिंग

xi jinping - Uighur Muslims

दिल्ली : चीनमध्ये सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारकडून उइगर मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराबाबतची माहिती अनेक वृत्तपत्रांमध्ये सातत्याने छापून येत असते. या अत्याचाराचे अनेक पुरावेही मिळाले आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग मात्र याबाबत म्हणतात – उइगर मुसलमानांना ( Uighur Muslims ) ‘सुधारण्या’साठी योग्य पद्धतीने शिक्षा देत ‘धडा’ शिकवत राहू.

उइगर मुस्लिमांची लोकसंख्या जास्त असणाऱ्या प्रदेशांमध्ये सरकारी छावण्या बांधून या मुस्लिमांवर अत्याचार केला जात असल्याचे अनेक मानवाधिकार संघटनांनी वेगवेगळ्या अहवालात म्हटले आहे. मात्र चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) म्हणतात, शिंजियांगमध्ये चीनला विरोध करणाऱ्या विचारसरणीला खतपाणी घातले जाते. हा विरोध मोडून काढण्यासाठी येथील लोकांना ‘व्होकेशनल ट्रेनिंग’ देण्यासाठी आम्ही ‘ट्रेनिंग सेंटर’ (Training Center)उभारले आहेत. शिंजियांग प्रांताच्या पश्चिमेकडे राहणाऱ्या समाजाचा विकास होत असून सरकार या भागातील लोकांना योग्य पद्धतीने शिक्षा देत धडा शिकवत राहीन. शिंजियांगमधील विरोधकांशी वागण्याची हीच योग्य पद्धत आहे असे पक्षाचे (सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे) मत आहे. यासंदर्भात दीर्घकालीन धोरण आखले पाहिजे असे पक्षाला वाटते, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे, अशी माहिती सरकारी वृत्तसंस्था असणाऱ्या शिंहुआ न्यूजने दिली आहे.

शिंजियांग प्रांताचा पश्चिमेकडील भाग उइगर मुस्लिमांच्या वस्तीचा आहे. या भागामध्ये ८० लाख उइगर मुस्लिम राहतात. या मुस्लिमांना सुशिक्षित करण्यासाठी आणि सभ्य बनवण्याच्या नावाखाली सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या छावण्यांमध्ये क्रूरपणे त्यांचा छळ केला जात असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. उइगर मुस्लिमांची प्रार्थनास्थळं पाडून तिथे सार्वजनिक शौचालये उभारली आहेत.

संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार शिंजियांमध्ये कमीत कमी १० लाख उइगर मुस्लिमांना जबरदस्तीने काम करण्यासाठी छावण्यांमध्ये ठेवण्यात आलं आहे. मात्र चीन कायमच उइगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भातील आरोप फेटाळून लावत आहेत. याच ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांना ठेवले जाते असा दावा चीनने केला आहे. अनेकदा चीनने अशा छावण्या अस्तित्वातच नसल्याचेही म्हटले आहे. मात्र आता चीनच्या राष्ट्राध्यक्षांनीही या छावण्यांमध्ये लोक आनंदात असून आम्ही त्यांना भविष्यातही शिक्षा देत राहू असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. देश, देशभक्ती आणि देशाच्या इतिहासाबद्दल त्यांना असणारी माहिती अधिक योग्य करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे म्हणून जिनपिंग यांनी अप्रत्यक्षपणे या छावण्यांमधील अत्याचारांचे समर्थन केले आहे.

ही बातमी पण वाचा : मतदानापूर्वी अमेरिका करू शकतो क्षेपणास्त्र हल्ला; चीनला वाटते भीती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER