या स्थगिती सरकारला स्थगिती देऊन आम्ही पुन्हा येऊ – पंकजा मुंडे

Pankaja Munde

परभणी : भाजपा सरकारने घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयाना स्थगिती देणारे हे महाविकास आघाडीचे सरकार, स्थगिती सरकार आहे. या स्थगिती सरकारला स्थगिती देऊन परत आम्ही येऊ, मराठवाडा पदविधर मतदारसंघाची निवडणुक म्हणजे सरकार स्थापनेची मुहूर्तमेढ ठरणार आहे, असा दावा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केला.

त्या परभणीत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचार मेळाव्यात बोलत होत्या. सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार तिन तिघाडी, काम बिघाडी सरकार आहे. मागील वर्षभरात या सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. भाजपाच्या सरकारने घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयास स्थगिती देणे हाच एककलमी कार्यक्रम या महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात राबवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER