‘ड्रग्ज’प्रकरणी विवेक ओबेरॉयचीही चौकशी करू – अनिल देशमुख

Vivek Oberoi - Anil Deshmukh

मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) याच्या ‘ड्रग्ज’ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बंगळुरू पोलीस मुंबईत आली आहे. मात्र, एनसीबीने (NCB) या प्रकरणाची अद्यापही चौकशी सुरू केलेली नाही. विवेक ओबेरॉयचीही या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आम्ही एनसीबीला निवेदन देणार आहोत. त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली नाही, तर मुंबई पोलीस विवेक ओबेरॉयची चौकशी करेल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सांगितले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले – विवेक ओबेरॉय भाजपाचे (BJP) स्टारप्रचारक आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील २७ भाषेतील बायोपिकमध्ये काम केले आहे. संदीप सिंह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. विवेक ओबेरॉय यांच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि इतर काँग्रेस नेत्यांनी केली आहे. विवेक ओबेरॉयची चौकशी करण्यासाठी बंगळुरू पोलीस मुंबईत आले आहेत. मात्र, एनसीबीने अद्यापही या प्रकरणाची चौकशी केलेली नाही. त्यामुळे आम्ही एनसीबीला निवेदन देणार असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्याची विनंती करणार आहोत. एनसीबीने या प्रकरणाची चौकशी केली नाही तर मुंबई पोलीस विवेक ओबेरॉयची चौकशी करेल.

सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी काल देशमुख यांची भेट घेऊन या ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. भारतीय जनता पक्षाच्या बॉलिवूड ड्रग कनेक्शन संदर्भातील सर्व पुरावे राज्य सरकारतर्फे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे सोपवले होते परंतु एनसीबीने अद्याप चौकशी केली नाही. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपीक निर्मात्याचे नाव येत होते. त्या निर्मात्याची चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी देखील केली होती. परंतु त्या दिशेने तपासच केला गेला नाही. राज्य सरकारने विनंती करुनही याचा तपास केला गेला नाही. या संदर्भात संदीप सिंह व विवेक ओबेरॉय यांचे नाव येत होते. ड्रग कनेक्शन संदर्भात बंगळूरु पोलिसांनी मुंबईत येऊन अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी छापे मारले परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणांना वेळ मिळत नाही हे आश्चर्याचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER