आपण सगळे घाटी होतो; शरद पवार-सुप्रिया सुळेंचा फेरफटक्यादरम्यान संवाद

Sharad Pawar - Supriya Sule - Maharashtra Today

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते आता सक्रिय झाले आहेत. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. कोरोना काळात काही घटकांना मदत करण्याची मागणी केली आहे. बरे वाटावे म्हणून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) पवारांना घेऊन घराबाहेर पडल्या. मुंबईत त्या गाडीतून फेरफटका मारत होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह करून शरद पवारांशी संवाद साधला. दरम्यान, दोघांनी सध्याची मुंबई आणि पूर्वीची मुंबई या विषयावर गप्पा मारल्या.

“नमस्कार रीतसर परवानगी घेऊन बाहेर पडलोय. लॉकडाऊन आहे याची जाणीव आहे, जबाबदारी आहे. मी आणि बाबा चेंज म्हणून ड्राईव्हला आलोय.” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. “मी साधारणत: ६२-६३ मध्ये काँग्रेसचा  युवक सेक्रेटरी म्हणून आलो. त्यावेळी दादरला खेड गल्ली होती. तिथे सगळे मिल वर्कर होते. यात पुणे जिल्ह्यातील लोक जास्त होते. आता त्याचं नाव काकासाहेब गाडगीळ लेन आहे. आता तिथे काँग्रेसचे टिळक भवन आहे. त्यावेळी मुंबईत जो भाग आहे तो सामान्य लोकांचा होता. तिथे कोकणी लोक मोठ्या संख्येने होते. एकत्र येऊन सण साजरे करणे.

जसे कोकणात वेगवेगळे सण आहेत, ते साजरे करायचे. तेव्हा घाटावरचे लोक म्हणायचे. आपण सगळे त्यावेळी घाटी होतो. ती वेगळी मुंबई होती, आताची वेगळी आहे. ते कल्चर वेगळे होते. मुख्य म्हणजे इथला सामान्य माणूस गेला. मराठी माणूस. आता बहुमजली इमारती आल्या. समाजकारण बदललंय.” या प्रकारच्या जुन्या आठवणी दोघांनीही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शेअर केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button