शिवसेनेसोबत कायम राहायचंय, स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या : अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना

Ajit Pawar

मुंबई : पल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे, त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या, असे आदेश राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  राष्ट्रवादीने (NCP) हा निर्णय घेतला असलायच्या चर्चा रजकीय वर्तुळात सुरु आहे .

आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. महाविकास आघाडी‌ झाल्यानंतर स्थनिक पातळीवर खटके उडत आहे पण आपल्याला सेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या” अशा स्पष्ट सूचना अजित‌ पवारांनी आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दिल्या. लवकरच महामंडळ वाटप करणार असल्याची माहितीही अजितदादांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी यापुढील सर्व निवडणुका एकत्रितरित्या लढण्याचे संकेत याअगोदरच दिले होते.

दरम्यान शिवसेना, भाजप, काँग्रेस या पक्षांप्रमाणंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता राष्ट्रवादीनंही मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांना  मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसक़़डूनच  ही बैठक बोलवण्यात आली आहे. मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे ही बैठक होत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार  , छगन भुजबळ  , धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ , राजेश टोपे  अशा बड्या नेत्यांची आणि काही महत्त्वाच्या मंत्र्यांचीही या बैठकीला उपस्थितीत होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER