धर्मकारण आणि राजकारणाची सांगड घालून १२० आमदार बनवायचे आहेत- पंकजा मुंडे

pankaja munde

बीड : भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगावातील भगवान गडावरून दसऱ्यानिमित्त मार्गदर्शन केलं. यावेळी पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी नामोल्लेख टाळत विरोधकांवर निशाणा साधला. मला तोडण्याचा प्रयत्न झाला. माझं राजकारण संपल्याचा अपप्रचार करण्यात आला. पण मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन. सध्या रात्र वैऱ्याची आहे. त्यामुळे सजग राहा. आपली वज्रमूठ कायम ठेवा. ती कायम असेल तर मोठमोठी सत्ताही हादरून जाते. आपल्याला धर्मकारण आणि राजकारणाची सांगड घालायची आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र केल्याशिवाय समाजाचा विकास होऊच शकत नाही.

आपल्याला राज्यात १२० आमदार बनवायचे आहेत, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी त्या म्हणाल्या की, आपल्याला कुणीच हात लावू शकत नाही. बजेट कसं घ्यायचं आणि काम कसं करायचं हे मी जाणते. बीड माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी जिथे आहे तिथेच आहे. मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन. आजही माझ्याकडे कुठलंच पद नाही. संपत्ती कमी झाली तरी चालेल; पण माझ्या दारातली गर्दी कधी कमी होता कामा नये, अशीच मी प्रार्थना करते. ऊसतोड कामगारांसाठीच माझा कारखानाही उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेतला. कारण माझ्या कामगारांचा संप सुरू आहे. बोलणाऱ्याचं काय जातं, जा तुम्ही संप करा म्हणून सांगतात. ऊसतोड कामगारांचे निर्णय फडात बसूनच घेतले पाहिजेत असं कुणी सांगितलं? मुंबईत बसूनही निर्णय का होऊ शकत नाही? असा सवाल करतानाच तुम्ही मुंबईत काय दिल्लीतही असला तरी इच्छाशक्ती असेल तर निर्णय होऊ शकतात.

ऊसतोड कामगारांना न्याय मिळू शकतो. मुंबईत बसून निर्णय घेतल्या जात नाहीत. ऊसतोड कामगारांचा प्रतिनिधी लवादात नको.असं ऊसतोड कामगारांच्या संघटनांचं म्हणणं आहे. कारखानदार ऊसतोड कामगारांचा नेता होऊ शकतो. ऊसतोड कामगारांचा नेता पक्षाचा नसतो. पवार साहेब, जयंत पाटील यांच्याशी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर चर्चा झाली. शरद पवारांनाच ऊसतोड कामगारांचा प्रश्न सोडवण्यास सांगितल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. मी निवडणुकीत पराभूत झाले, तर माझ्या कार्यकर्त्यांनाच अधिक वाईट वाटलं.

मी पक्षाची राष्ट्रीय मंत्री झाले  असल्याचंही पंकजा मुंडेंनी यावेळी आवर्जून नमूद केलं. लॉकडाऊनमध्ये ऊसतोड कामगारांच्या भाकरी भिजत होत्या, आम्हाला खायला काही नाही, व्हिडीओ कॉल करून ते दाखवत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे भाऊच आहेत, त्यांनी प्रेमानं विचारलं किती आदळआपट करशील, तर मी म्हणाले, ऊसतोड कामगारांसाठी आदळआपट करावीच लागेल. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजवरही पंकजा मुंडेंनी टीका केली. उद्धव ठाकरेंनी १० हजार कोटींचं पॅकेज घोषित केले.

मी त्यांचं स्वागत करते. मात्र या १० हजार कोटींच्या पॅकेजमध्ये साधा रुमालही येणार नाही. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी हे पॅकेज पुरेसं नाही. शेतकऱ्यांचे अत्यंत हाल झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घ्यावा. या पॅकेजने शेतकरी, ऊसतोड कामगारांची दिवाळी कशी गोड होणार? असा सवाल करतानाच आणखी मदत वाढवून द्यावी, अन्यथा विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला. या दसऱ्या मेळाव्याला कोणीही येऊ नये, असं मी सांगितलं आहे. परंतु ऑनलाइन मेळावा असतानाही बरेच लोक आले आहेत.

हेलिकॉप्टरनं येण्याची परंपरा होती; पण कोरोनामुळे  हेलिकॉप्टरऐवजी गाडीनं आले. अतिवृष्टीनं शेतकरी बेजार झाला आहे. भगवानबाबांची मूर्ती माझ्या पाठीशी आहे. भगवानबाबांचा  आशीर्वाद पाठीशी आहे हे इथे येताना जाणवत होतं. माझे बंधू महादेव जानकर यांच्याशिवाय माझा कोणताही कार्यक्रम पूर्ण होत नाही. या नात्याला कोणाची दृष्ट लागू नये, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. विजयादशमीच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते, विजयादशमीला सीमोल्लंघन होत असते. ही जबाबदारी खूप मोठी आहे. भगवानगडाकडे येताना गावोगावी माझं स्वागत केलं जात होतं. शेतकऱ्यांनी प्रेमानं फुलं देऊन भगवानबाबांना अर्पण करायला सांगितली.  हे पाहून माझं मन भरून आलं.

लोकांच्या प्रेमानं मी भारावून गेले. हे  लोक एवढे  का प्रेम करतात? तेव्हा मागे वळून पाहिलं तर भगवानबाबांची मूर्ती दिसली आणि मुंडेसाहेबांची कीर्ती सोबत दिसली, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. आता मी राज्यभर फिरणार आहे. गावोगावी जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहे. कोरोना असला तरी फिरणार आहे. रस्त्यावर कसं उतरायचं हे मला चांगलंच ठाऊक आहे. आता नुसतं भगवान गडावरच नाही तर आपल्याला मुंबईतलं शिवाजी पार्कही भरवायचं आहे. आपली शक्ती दाखवून द्यायची आहे,असेही त्या म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER