जगाला कोरोना लस पुरवण्याच्या पंतप्रधानांच्या ‘व्हिजन’ला आमचा पाठिंबा – अदर पूनावाला

Adar Poonawalla - PM Narendra Modi

पुणे : कोरोनाच्या (Corona) संकटावर मात करण्यासाठी भारतासह जगभरात लसींवर सध्या काम सुरू आहे. भारताच्या लसीचे उत्पादन आणि तिच्या वितरणाची क्षमता संपूर्ण मानवतेला संकटातून बाहेर काढण्याच्या कामी येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषणात म्हणालेत. यावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण असून सरकारची व्यवस्था भारतीयांच्या सर्व गरजांची काळजी घेईल, असे ते ट्विट करून म्हणालेत.

अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी ट्विट केले – “जगाला लस पुरवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनला आमचा पाठिंबा आहे. हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. तुमच्या नेतृत्वासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. हे स्पष्ट आहे की, भारतासाठी तुमची तयारी भारतीयांच्या सर्व गरजांची काळजी घेईल.

पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्यावतीने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेकासोबत कोरोनावर लस विकसित करण्यात येत आहे. सीरम ही संस्था जगातील सर्वांत मोठ्या लसनिर्मिती करणाऱ्या संस्थांपैकी एक आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात जी लस विकसित केली जाते आहे, त्या लसीच्या उत्पादनात या कंपनीची भागीदारी आहे.

शनिवारी अदर पूनावाला यांनी केंद्र सरकारला सवाल केला होता की, “सरकारजवळ पुढील एका वर्षात लोकांसाठी लसीवर खर्च करण्यासाठी ८० हजार कोटी रुपये आहेत का? आम्हाला लसीच्या खरेदी आणि वितरणाच्या संदर्भात आपल्या देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारत आणि परदेशातील लस निर्मात्यांच्या मार्गदर्शनची गरज आहे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER