केंद्र सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला; १४ डिसेंबरला देशभरात आंदोलन

we-reject-the-government-proposals-says-farmer-leaders

नवी दिल्ली : मागील १४ दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे मोठ्या घडामोडी घडत आहेत. मंगळवारी झालेल्या भारत बंदनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  (Amit Shah) आणि शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर आज केंद्र सरकारकडून (Center Govt) शेतकऱ्यांना नवा प्रस्ताव देण्यात आला. पण शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारचा हा कायदा दुरुस्ती प्रस्ताव फेटाळला आहे.

नव्या कायद्यात किमान आधारभूत किंमत अर्थात आधारभूत किंमत कायम राहील असं आश्वासन केंद्र सरकारकडून देण्यात आलं. पण तीनही कृषी कायदे रद्द करा, या मागणीवर शेतकरी (Farmers) अडून बसले आहेत. एवढंच नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. १२ डिसेंबर रोजी संपूर्ण देशात टोलप्लाझा बंद पाडण्यात येणार आहेत.

तसेच दिल्ली-जयपूर आणि दिल्ली-आग्रा हायवे जाम करण्यात येणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. १४ डिसेंबर रोजी देशभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. देशात ठिकठिकाणी या दिवशी निदर्शनं आणि धरणे आंदोलनदेखील केलं जाणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.

रिलायन्स आणि अदानीवर बहिष्कार

सरकारची आर्थिक कोंडी करण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी देशभर रिलायन्सच्या सर्व प्रोडक्ट्सवर बंदी घालण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. यासोबत रिलायन्स जिओच्या सीमकार्डवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. देशभर रिलायन्स आणि अदानीशी निगडित मॉल्सवरही बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER