नीरेचे पाणी बारामतीला देण्याविरुद्ध न्यायालयात दाद मागणार : खासदार रणजित निंबाळकर

मुंबई :- नीरेचे पाणी बारामतीला देणे अयोग्य असून सरकारच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयत जाणार असल्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनी म्हटले आहे. तसेच याविरुद्ध जनतेतही संघर्ष करणार असल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडीने केलेला निर्णय विश्वासघातकी असल्याचे ते म्हणाले. निश्चितपणे याचे पडसाद सर्वसामान्य जनतेत उमटतील. जवळपास खंडाळा, माळशिरास, फलटण, पंढरपूर 10 लाख लोकांवर अन्याय करणारा हा निर्णय विशेष करून बारामतीकरांचा हा निर्णय आहे. या दुष्काळी भागाचे पाणी बारामतीला वळवण्याचे महापाप कालच्या बैठकीत त्यांनी केले असल्याचे निंबाळकर म्हणाले.

कर्जमुक्ती योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील १८३०७ लाभार्थ्यांचे अर्ज

या निर्णयाच्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. याचे पडसाद लवकरच राज्यभरात उमटतील. माढा मतदार संघात जनसंघर्ष दिसून येईल. माढा मतदार संघातील लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय बैठक बोलावणार असल्याचे ते म्हणाले. फडणवीस सरकारमध्ये नीरेचे पाणी बारामतीला देणे बंद करण्यात आले होते. मात्र महाविकास आघाडीच्या कालच्या कॅबिनेट  बैठकीत हे पाणी पुन्हा बारामतीला देण्याचा निर्णय घेण्यात आला.