मराठा आरक्षणासाठी दिल्लीवरच धडक द्यावी लागेल – शिवसेना

Maharashtra Today

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Resrvation) कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात विविध पर्यायांची चाचपणी सुरू आहे. मराठा समाजाने रस्त्यावर उतरावे, असे भाजपा म्हणते. भाजपाचेच राज्यसभेतील खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी मात्र या भूमिकेला विरोध केला आहे. त्यांनी राज्यभर दौरा सुरू केला असून, विविध पक्षाच्या नेत्यांना भेटत आहेत. संभाजीराजे यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला असून, त्यावर शिवसेनेने (Shivsena) भूमिका मांडली आहे.

सामनातून भूमिका मांडताना शिवसेनेने म्हटले आहे की, मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ६ जूनपर्यंत निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. खासदारकीचाही राजीनामा देऊ, असे सांगितले आहे. बहुजन समाजाची इच्छा असेल तर वेगळा पक्ष काढू, असे सूतोवाचही कोल्हापूरच्या छत्रपतींनी केले आहे.

छत्रपती संभाजीराजे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनाही भेटले. बहुजनांच्या हितासाठी एकत्र काम करण्याचे सूतोवाचही दोन्ही प्रमुख नेत्यांनी केले. आंबेडकर व छत्रपतींनी एकत्र येऊन नवा राजकीय पक्ष काढला तर काय होईल? प्रकाश आंबेडकरांनी काल कुठेतरी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणातील शिळेपणा कमी होईल. एक लक्षात घेतले पाहिजे संभाजीराजे छत्रपती हे सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत व छत्रपतींची ही नियुक्ती राष्ट्रपतींकडून भारतीय जनता पक्षाने करून घेतली आहे. छत्रपतींना या उपकाराची आठवण चंद्रकांत पाटील यांनी करून दिल्याने लोकांत नाराजी निर्माण झाली. छत्रपती संभाजीराजे फक्त आंबेडकरांनाच भेटले नाहीत, तर महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच प्रमुख नेत्यांना ते भेटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे अशा नेत्यांना भेटून त्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला न्याय मिळायलाच पाहिजे व त्यासाठी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावायलाच हवा, ही त्यांची भूमिका आहे,” असे शिवसेनेने म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Govt) आरक्षणाबाबत केलेला कायदा व घेतलेली भूमिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आरक्षणाबाबत असा कायदा करण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारलाच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन राजभवनात गेलेत. राज्यपालांना निवेदन दिले व मराठा आरक्षणाचा तिढा केंद्राने लवकारात लवकर सोडवावा, असे सांगितले. आता पंतप्रधान मोदी व राष्ट्रपतींनाच निर्णय घ्यायचा आहे. राज्याचे सरकार मराठा आरक्षणप्रश्नी हात झटकू शकत नाही. हात झटकत आहे ते केंद्र सरकार. म्हणूनच मराठा आरक्षणप्रश्नी दिल्ली दरवाजावर हत्तीची टक्कर देणे आवश्यक आहे व ही धडकच निर्णायक ठरेल,” असे शिवसेनेने म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : सीएमसाहेब, मराठा-ओबीसी सहमती घडवा…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button