संविधानाच्याच सहाय्याने वाटचाल करायची आहे : मोदींनी मानले जनतेचे आभार

PM Modi

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजधानी दिल्लीतील भाजप कार्यालयासमोर उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, प्रामाणिकपणातून मिळालेली ताकद जनतेने दिलेल्या निकालातून दिसून आली आहे.

मोदी म्हणाले, आमचा विजय हा शेतक-यांचा, मध्यमवर्गियांचा आहे. ही निवडणूक देशाच्या जनतेने लढली आहे. संविधान आमच्यासाठी सर्वोच्चस्थानी असून त्याच्याच सहाय्याने आम्हाला पुढे जायचे आहे. सरकार जरी बहुमताने चालत असले तरी देश सर्वमाने चालतो. आम्हाला सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करायची आहे. आमच्या विरोधकांनाही सोबत घेएऊन देशहितासाठी आम्ही वाटचाल करणार आहोत. ही वाटचाल संविधानाचा आदर राखत नम्रपणे करण्यात येईल, असेही मोदी म्हणाले.

ही बातमी पण वाचा : राजकारण विसरून आता विकास करण्याची गरज : नितीन गडकरी

धर्मनिरपेक्ष नेत्यांची तोंडं बंद झाली असून त्यांचे चेहरे उघडे पडले असल्याचे मोदी म्हणाले. त्यांनी धर्माच्या नावांवर देशात दुही निर्माण करणा-यांना टोलाही लगावला. देशाला 21 व्या शतकामध्ये गरीबीतून मुक्त करायचे असेून समृद्धीच्या दिशेने न्यायाचे असल्याचे ते म्हणाले. स्वातंत्र्य चळवळीसाठी जे योगदान जनतेने दिले ते योगदान जर समृद्ध हिंदुस्थानासाठी दिले तर 2024 पूर्वी आपण महासत्ता बनू शकतो असेही मोदी म्हणाले.

तुम्ही दाखवलेल्या विश्वासाने आमची जबाबदारी वाढल्याचे सांगत मोदी म्हणाले, जनतेने विश्वासाने आणि काही संकल्प मनात ठेवून आम्हाला मतदान केले आहे. तुमच्या भावना आम्ही जाणतो, असे म्हणत त्यांनी जनतेचे आभार मानले.

ही बातमी पण वाचा : आगामी सरकारने अर्थव्यवस्था दुरुस्त करण्यास प्राथमिकता द्यावी !