‘तुमच्यासारखी सत्ता चोरून आणली नाही’, भाजपने अशोक चव्हाणांना खडसावले

Pravin darekar -ashok chavan - Maharashtra Today

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Marathaservation) मुद्द्यावरुन सध्या राज्यात महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र सध्या दिसत आहे. काल प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारचे मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मराठा आरक्षणासह देशभरातील इतरही राज्यांच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारने कातडी बचाव धोरण स्वीकारू नये, असा टोला लगावला होता.

अशोक चव्हाण यांनी केलेल्या या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. अशोक चव्हाणांनी केंद्र सरकारवर बोट दाखवू नये. त्यांनी स्वत: राज्यासाठी काही तरी करून दाखवावं. चव्हाणांनी औकातीत राहावे. त्यांची औकात काय आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही काय करावं ते आम्हाला सांगू नये, असं पाटील म्हणाले होते. त्यानंतर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी अशोक चव्हाण याना लक्ष्य केले आहे.

अशोकराव,दादांचं म्हणणं खूपच लागलेलं दिसतंय. कातडी बचाव हा शब्द महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये बसतो का? जेव्हा आम्ही सत्तेत आलो,तेव्हा आम्ही आमच्या ताकदीवर आलो,आम्ही सत्ता तुमच्यासारखी चोरून आणली नाही, अश्या तिखट शब्दात प्रवीण दरेकर यांनी अशोक चव्हाण यांना खडसावले आहे.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button